ज्यांच्या कथा वाचून वाचक आपल्या व्यथा विसरून जातात, अशा लाडक्या पु.लंच्या जीवनावर आधारीत ‘भाई’ या चित्रपटाचा दुसरा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे ह्या चित्रपटात अभिनेता सक्षम कुलकर्णी पु. लंच्या विद्यार्थीदशेतील भूमिका साकारताना दिसणार आहे, तर अभिनेता सागर देशमुख पु. लंच्या तरूपणापासून ते उतारवयातील प्रवास आपल्या अभिनयातून रुपेरी पडद्यावर साकारणार आहे.